वैजापूर, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील देवगाव रंगारी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह बळेगाव या मूळ गावी एका पडक्या घरामध्ये पुरलेले अवस्थेत आढळून आला. या घटनेने गावासह पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे याप्रकरणी पोलिसांनी दिवेकर यांचे चुलत भाऊ व पुतण्या या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
नानासाहेब रामजी दिवेकर (वय ४५, हल्ली मुक्काम पडेगाव) हे देवगाव रंगारी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दिवेकर हे ३० डिसेंबर रोजी आपले -कर्तव्य बजावून घरी गेले परंतु दोन तीन दिवस झाले. त्यांचा कुठेही पत्ता लागत नव्हता नातेवाईकांसह पोलिसांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला ४ जानेवारी रोजी नानासाहेब यांचे लहान बंधू लहानु दिवेकर हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत तपासाला सुरुवात केली.
काही गावकऱ्यांना बळेगाव येथील एका पडक्या घरात जवळ काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. याची तात्काळ माहिती शिवूर पोलिसांना देण्यात आल्यानंतर शिऊर पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिसराची पाहणी केली. त्या ठिकाणी गड्डा खोदून काहीतरी संशयास्पद पुरल्याची आढळून आले.
नायब तहसीलदार सुरज कुमावत यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह घाटी येथे हलवण्यात आला.
पोलिसांनी खड्डा खोदले असता त्या ठिकाणी नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत नानासाहेब दिवेकर यांचे लहान बंधू लहानु दिवेकर यास ताब्यात घेत चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये लहानु दिवेकर याने गुन्ह्याची कबुली देत २ जानेवारी रोजी रात्री भावजय सोबत अनैतिक संबंध असल्यास संशयातून त्याने धारदार कोयत्याने नानासाहेब यांच्या डोक्यावर वार करत खून करण्यात आला.
त्यानंतर पडक्या घरात मृतदेह पुरण्यात आला. सदरील घटनेनंतर घटनेची गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग डीवायएसपी भागवत फुंदे स्थानिक गुन्हे शाखेचे विजय राजपूत शिवर पोलिस स्टेशनचे वैभव रणखांब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्री फिरवत दोन संशयतांना ताब्यात घेतले सदर गुन्ह्यांमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत नानासाहेब दिवेकर यांच्या पश्चात पत्नी वृद्ध वडील एक मुलगा असा परिवार आहे ते सध्या पडेगाव येथे वास्तव्यास होते.















